सवयी बदलताना

आपली एखादी सवय आपल्यालाच त्रासदायक आहे हे जोपर्यंत माणसाला “जाणवत” नाही तोपर्यंत तो स्वतमध्ये काही बदल करू बघत नाही.

नियम म्हणून किंवा ईतर म्हणतात म्हणून वर्तनबदल वगैरे जरा अवघडच असते. बदलासाठी Self-realisation ही प्राथमिक गरज असते त्यानंतर बदलासाठीचे प्रयत्न केले जातात.

उदाहरण म्हणून आपण आपल्या इंटरनेट वापराच्या सवयी बद्दल बोलू. Internet चा, खासकरून समाज माध्यमांचा अतिरिक्त वापर मानसिक आरोग्यासाठी चांगला नाही हे सगळ्यांना माहित असते. पण सवयी बदलायच्या तर नुसती माहिती असणे पुरेसे होत नाही तर त्याची स्वताला जाणीव व्हावी लागते. समाज माध्यमांवर/ Social मीडिया वर सतत सक्रिय असल्याचा आपल्या मनस्वास्थ्यवर परीणाम होत आहे का हे आपल्याला खालील निकषांवरून पडताळून बघता येईल.

1) मोबाईल हातात असला की माझी इतर कामे मागे पडतात का? माझे routine विस्कळीत होते का?

2) मोबाईल वर काहीतरी बघत असताना, अचानक कोणी हाक मारली, किंवा काही कामं सांगितले तर चिडचिड होते का?

3) मोबाईल हातात घ्यायची हुक्की आली की माझ्याकडून हातातली चालू कामं गडबडीने संपवली जातात का?

4) आपल्या करमणुकीसाठी मोबाईल ह्या एकाच साधनावर आपण अवलंबून राहिले आहोत का?

5) सततच्या माहितीच्या माऱ्याने डोके जड होते आहे असे वाटते का?

6) समाज माध्यमांवरच्या मैत्रीला कळत नकळत जास्त महत्व दिल्याने खऱ्या आयुष्यातील नाती मागे पडत आहेत का?

7) ऑनलाईन क्लास आणि कामाच्या नादात घराबाहेर पडणे, चार लोकांत मिसळणे कमी होते आहे का?

8)  आपली likes ची, कौतुकाची भूक वाढलेली आहे का?

9) समाज माध्यमावर मी सक्रिय नसते तेंव्हाही माझ्या मनात तिथलेच विचार चालू असतात का?

ह्यातले काहीही आपल्या बाबतीत होते आहे असे जाणवले तर मोबाईल पासून, इंटरनेट अर्थात सोशल मिडीया पासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा.

मग काय करता येईल ते बघू.

1) आपल्या रोजच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट समाज माध्यमावर शेअर करण्याची आपली urge observe करायची.

2) समाज माध्यमावर मला काय बघायचे आणि काय नाही बघायचे हे sort out करायचे. त्या प्रमाणे setting करायचे. E.g. नको असतील त्या Posts, pages, reels unfollow / hide/ block करत रहायचे कालांतराने त्यांचे pop up होणे कमी होते.

3) ज्यांचे घरातून काम चालते त्यांनी दिवसभरात एकदातरी कम्पल्सरी घराबाहेर पडायचे. ऑनलाईन क्लासेस पेक्षा ऑफलाईन पर्याय शोधायचे.

4) मोबाईल च्या वापरात मेंदूला Instant gratification ची भूक लागलेली असते ती इतर कश्यात तरी शोधायची. E.g. आपल्या मुलांशी, pets शी खेळणे, झाडांना पाणी घालणे, झाडांशी मनात चार गप्पा मारणे वगैरे.

5) मन प्रसन्न राहण्यासाठी घराबाहेर पडून व्यायाम करणे E.g. कॉलनी मध्ये, बागेत चालायला जाणे हे senior citizens साठी तर जास्तच महत्वाचे आहे.

6) एरवी कदाचित भेटणारही नाहीत इतके वेगवेगळ्या क्षमतांचे लोक आपल्याला समाज माध्यमात भेटत असतात तर त्यांच्याशी आपल्या जगण्याची तुलना करणे थांबवायचे.

7) नाव गाव संदर्भ नसणाऱ्या forwarded messages पासून कटाक्षाने दूर रहायचे. सत्य पडताळून बघण्याची सवय लावायची.

8) आपण social media वर शेअर केलेले photos, links delete केले तरी ते backup, cache मध्ये दिसत राहतात हे कायम लक्षात ठेवायचे.

आपल्या रोजच्या कामात, जगण्यात आपण “रमायला” लागलो, रोजच्या जगण्यातली “अनुभूती” महत्वाची वाटायला लागली, ती फक्त स्वतः जवळ ठेवावी वाटली की मग मोबाईलची गरज वाटेनाशी होते.

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top