शिस्त आणि संस्कार

शिस्त आणि संस्कार ह्याची आपल्या मुलांसाठी आपली काय व्याख्या आहे हे एकदा पालकांनी ठरवून ठेवावे. मुलं वाढवताना नकळत पालक ईतक मुलाचं आयुष्य आपल्या हातात घेतात की मुलांचं स्वतंत्र अस्तित्वच विसरून जावं. मुलं आई बापाच्या अपेक्षेला पुरेसे पडायचा प्रयत्न करतात पण एका limit नंतर ते सगळं धुडकावूनही देतात. पालक म्हणून मुलांसाठी मी शिस्त category मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करते हे एकदा विचार करून ठेवावे.

उदाहरण म्हणून यादी देते.

1) मुलांनी घरी सर्व फळे, भाज्या खाव्यात.

2) रोज शाळेचा अभ्यास करावा.

3) रोज संध्याकाळी श्लोक म्हणावेत.

4) वयाने मोठ्या माणसाना नमस्कार करावा.

5) आपल्या वस्तू जागेवर ठेवाव्यात, खेळ आवरून ठेवावेत.

6) इतर कोणाला प्रत्यक्ष दुखावतील असे अपशब्द वापरू नयेत.

7) मोबाईल, TV कमी बघावा.

8) रोज व्यायाम करावा.

9) पालकांन बरोबर सर्व लग्न कार्यात सहभागी व्हावे.

10) नातेवाईकां कडे गेल्यावर तिथे असेल तसे adjust होऊन रहावे.

11) आपल्या वस्तू इतरांबरोबर शेअर कराव्यात.

12) सकाळी लवकर उठावे.

म्हणजे करायची तर अशीच लांबलचक यादी होते पण मला स्वतःला पालक म्हणून माझ्या मुलांनी कराव्यात अश्या कोणत्या दोन चार गोष्टी गरजेच्या वाटतात तेव्हढेच पालकांनी sort out करून ठेवावे. म्हणजे पालकांच्या अपेक्षाना पुरून उरता उरता, मुलं दमायला नकोत की पालकांचा अपेक्षाभंग आणि ताणही वाढायला नको.

बरोबरीने लक्षात घ्यायचे की,

1) शिस्त म्हणून दोन चार मर्यादित अपेक्षा असतील तर मूल ती ऐकण्याची शक्यता असते.

2) अमुक एक गोष्ट का करावी ह्याचे मुलांना योग्य वाटेल, पटेल असे उत्तर देता आले तर त्यांच्याकडून स्वीकाराची शक्यता असते.

3) कोणत्याही वागण्याचे बरे वाईट परीणाम असतात. परिणाम मुलांना सहन करू द्यावेत त्यातून ती जास्त चांगले शिकत असतात. उदा. अभ्यास केला नाही बाई रागवतात, वस्तू जागेवर ठेवल्या नाहीत तर ऐन वेळी मिळत नाहीत हे त्यांचे त्यांना कळलेले बरे असते.

4) मुल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्याचे त्याला मत, आवड निवड असते.

5)त्याच्या स्वतःच्या अश्या क्षमता, मर्यादा असतात.

6) जे मुलांनी करावे वाटते ते तसे घरातील सर्वांनी केले तर प्रत्यक्ष उदाहरण बघून आत्मसाद करण्याकडे मुलांचा जास्त कल असतो.

मी पालक असले तरी आदर्श व्यक्ती नाही. मी चुकत, माकत असते, घोळ घालत असते त्यातूनच शिकतही असते हे लक्षात ठेवायचे. पालकांनी स्वतःचे विशेष गुण आणि मर्यादा ओळखल्या असतील, त्याचा स्वीकार केला असेल तर त्यांना मुलांचे गुण, मर्यादा स्वीकारणे सोपे जाते.

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top