
1) स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो आहे ह्याचा स्विकार करणे ही प्राथमिक पायरी आहे.
2) शहरी भागात जागोजागी psychiatrists आणि psychologist असतात. चार जणांशी बोलून अचूक निदान करणारे, अनुभवी डॉकटर शोधून काढणे फार महत्वाचे असते. शक्यतो Google reviews वरती विसंबून राहू नये असे मला वाटते.
3) नंतर येतो psychologist. अनुभवी psychologist ही शोधवाच लागतो. त्याला सगळ्या मानसिक आजारांची इतांभूत माहिती असावी लागते. तुम्ही समोर गेलात, त्यांच्याशी बोललात तर तुमचा आजार, त्यातल्या विचारांचे patterns, prominent emotions खटाखट जो तुम्हाला समजावून सांगेल तो खरा.
4) हजारो मानसिक आजार आहेत प्रत्येकाची लक्षण वेगळी. नुसते झोप, भूक, रोजचे काम ठीक चालू आहे ना ह्यावर आजाराचे असणे / नसणे ठरत नाही. So तज्ञ व्यक्ती गरजेच्या.
5) medicines हा treatment मधला फकत एक भाग असतो. त्या बरोबर अनेक गोष्टी करायच्या असतात. जसे की स्वताचा आजार समजून घेणे, त्याचा पॅटर्न समजून घेणे, त्रास देणारे विचार, भावना ह्यांची वेळोवेळी नोंद करून ठेवणे, आपल्या प्रकृतीला झेपू शकेल असा व्यायाम प्रकार ठरवणे, आहार ठरवणे, कामाचे स्वरूप ठरवणे वगैरे.
इथे हे लक्षात घ्यायला हवे –
A. प्रत्येक मानसिक आजार वेगळा असतो. अगदी anxiety disorder हा आजार बघितला तरी प्रत्येकाला वाटणारी anxiety वेगळ्या प्रकारची असते, त्या मागचे विचार, भावना वेगळ्या असतात. So complete individualistic treatment plan is very much essential.
B. आपल्या कडे सल्ले देणारे हजार असतात. मात्र psychiatrist, psychologist आणि जवळची एक
व्यक्ती सोडून फार कोणाच ऐकू नये.
C. स्वतच्या मनाचा , विचारांचा, भावनांचा अभ्यास करायला लागलो की आजाराची भिती वाटणे थांबते. मानसिक आजार हे एक कोडे आहे जे स्वतःलाच प्रयत्न पूर्वक सोडवायला लागते, एकदा ती जबाबदारी घेतली की जे empowered feeling येते ते महत्वाचे. तुमच्या treatment plan मध्ये तुमचा say असायला हवा. आजार आहे म्हणून गर्भगळीत होऊन इतरांच्या हातात स्वतच्या जगण्याच्या किल्ल्या देऊ नयेत.
D. मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीने कामात व्यस्त असणे गरजेचे हे ठीकच पण ते काम आवडीचे असावे नाहीतर कामाचे नवीन ताण निर्माण व्हायचे. घरकाम करायचे/ नोकरी करायची/ व्यवसाय करायचा/ volunteer work करायचे/ freelance करायचे / नवीन काही शिकायचे/ छंद जोडायचे किंवा आणखी काही.
नेमके काय करायचे ते त्या त्या व्यक्तीने त्याच्या स्वताच्या / कौटूबिक गरजे नुसार ठरवायचे. इथे अमुक एक हा हट्ट उपयोगी नाही. बर ‘रिकाम्या वेळेत मनात नाहीते विचार येतात’ म्हणून सारखे व्यस्त व्हायचे का? हे ही ठरवायचे. “विचारांना घाबरून त्या पासून पळ काढायला म्हणून जादाची कामं वाढवून घेत नाही ना” ? हाही विचार करायचा.
D. लोक जे सांगतात “मानसिक आजारावर विजय” वगैरे असले काही ऐकू नये. मानसिक आजार आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात तुमच्या बेसावध क्षणी परत कधीही तुम्हाला गाठू शकतो पण एकदा त्याला नियंत्रणात ठेवायचा skills set तयार करून ठेवला की मग त्याची भिती वाटणे बंद होते.
E. प्रत्येक व्यक्ती unique असते, स्वतः चे खास गुण, कौशल्य असतात ती शोधायची, त्याला वाव मिळेल हे बघायचे, इतरांशी तुलना करणे टाळायचे.
F. confidence ही रोज कमवायची गोष्ट आहे. नवीन काहीतरी करायचं/ शिकायचं, चुकायचं.. स्वतः ला चुकायची परवानगी दिली की confidence आपोआप येतोच.
शेवटचे आणि महत्वाचे
मानसिक आजार आपल्याला संवेदनशील बनवतात, माणूस म्हणून घडवतात, आपल्या बरोबर इतरांच्या प्रश्नांबद्दल सजग व्हायला मदत करतात. आपल्या त्रासाचे करूणेत रूपांतर करता आले तर त्या सारखे सुंदर काही नाही ❤️
#मनच्यागोष्टी #अनुभवाच्यागोष्टी

